आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी...
शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हटलं जातं. वारंवार कोर्टाच्या चकरा मारून कंटाळलेल्या त्रस्त माणसाने तळमळून इतरांना असं सांगितलं असावं. कारण कोर्टाचा निकाल काय लागेल याचा भरवसा नसतो, आणि लागल्यावर न्याय मिळेलच असंही नाही. मात्र कोर्टाबाहेर राहून इतरांच्या कोर्ट केसेस ऐकणं अतिशय रंजक असतं. म्हणूनच इंग्लंडमधल्या न्यायालयीन खटल्यांचा ओझरता आढावा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे........